Saang Na - From Classmates

Kshitij Patavardhan

तुटताना तुटतो हा जीव का सांग ना
निघताना अडतो पाय का
तुटताना तुटतो हा जीव का सांग ना
निघताना अडतो पाय का
संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी
सरताना सरते ही वेळ का सांग ना
तुटताना तुटतो जीव हा

हरलेले श्वास हे श्वास हे चुकलेली चुकलेली पावले
मन मागे ओढते अडखळते अन पडते का
माझे सारे जिथे काही नाही तिथे
मन तरीही सारखे घुटमळते अन रडते का
नसताना असतो हा भास का सांग ना
तुटताना तुटतो जीव हा

स्वप्ने विरली आता जो तो झाला रिता
त्या दिवसांची हवा दरवळते अन छळते का
क्षण हे जाळिती राती आता सुन्या
तो पाहून चांदवा गलबलते मन हलते का
मिटताना मिटतो काळोख का सांग ना
तुटताना तुटतो हा जीव हा
आ आ आ ओ ओ ओ ओ ओ

Curiosidades sobre la música Saang Na - From Classmates del Shekhar Ravjiani

¿Quién compuso la canción “Saang Na - From Classmates” de Shekhar Ravjiani?
La canción “Saang Na - From Classmates” de Shekhar Ravjiani fue compuesta por Kshitij Patavardhan.

Músicas más populares de Shekhar Ravjiani

Otros artistas de Film score