Nakalat Vinale Jate Jale

नकळत विणले जाते जाळे नकळत गुंतत जाते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतःस परके होते मन
होते मन होते मन
नकळत विणले जाते जाळे नकळत गुंतत जाते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतःस परके होते मन
हे नाते कोणते हे धागे कोणते
कुणीतरी फुलते दूरवर दरवळते इथे मन
अलगद नव्या रंगात न्हाते धरा
अवचित कसा होतो खुला पिंजरा
सहजच येते साद नभाची सहज पाखरु होते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतःस परके होते मन
हे नाते कोणते हे धागे कोणते
कुणीतरी फुलते दूरवर दरवळते इथे मन

मौनातुनी झरते जसे चांदणे
शब्दातले जाते कुठे बोलणे
मौनातुनी झरते जसे चांदणे
शब्दातले जाते कुठे बोलणे
कोण छेड़ते अबोल तारा अबोल जैसे आहे मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतःस परके होते मन
हे नाते कोणते हे धागे कोणते
कुणीतरी फुलते दूरवर दरवळते इथे मन

केव्हातरी येतात लहरी अश्या
रेंगाळती वाळूत लाटा जश्या
केव्हातरी येतात लहरी अश्या
रेंगाळती वाळूत लाटा जश्या
क्षणभर दिसतो एक किनारा क्षणभर वेडे जळते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतःस परके होते मन
हो, हे नाते कोणते हे धागे कोणते
कुणीतरी फुलते दूरवर दरवळते इथे मन
नकळत विणले जाते जाळे नकळत गुंतत जाते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतःस परके होते मन

Músicas más populares de स्वप्निल बांदोडकर

Otros artistas de Traditional music