Dur Dur

Amit Raj

पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रे
उठला हा जाळ आतून करपल रान रे
उजळ्तांना जळून गेलो राहील ना भान
डोळ्यातल्या पाण्याने हि भिजेना तहान तहान

दूर दूर चालली आज माझी सावली
दूर दूर चालली आज माझी सावली
कशी सांज हि उरी गोठली
उरलो हरलो दुखः झाले सोबती
उरलो हरलो दुखः झाले सोबती

काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला
मी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपला
मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा
रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा
आपुलाच तो रस्ता जुना
आपुलाच तो रस्ता जुना
मी एकटा चालू किती
उरलो हरलो दुखः झाले सोबती
उरलो हरलो दुखः झाले सोबती

लाभतो सारा दिलासा कोणता केला गुन्हा
जिंकुनी हि खेळ सारा हारते मी का पुन्हा.(हारते मी का पुन्हा)
त्रास लाखो भास लाखो कोणते मानू खरे
उरण्या त्या पावसाचे घाव मनावर का चढे (घाव मनावर का चढे)
समजावतो मी या मना
समजावतो मी या मना
तरी आसवे का वाहती
उरलो हरलो दुखः झाले सोबती
उरलो हरलो दुखः झाले सोबती.

Curiosidades sobre la música Dur Dur del स्वप्निल बांदोडकर

¿Quién compuso la canción “Dur Dur” de स्वप्निल बांदोडकर?
La canción “Dur Dur” de स्वप्निल बांदोडकर fue compuesta por Amit Raj.

Músicas más populares de स्वप्निल बांदोडकर

Otros artistas de Traditional music