Karaar Premache [Male Version]
Mangesh Kangane
कसे निराळे हे
करार प्रेमाचे
कुणास बोलावे
मनातले सारे
कसे निराळे हे
करार प्रेमाचे
कुणास बोलावे
मनातले सारे
तू रोज दिनरात हाकेवरी
तरी भास होती विरहाचे
कसे निराळे हे
करार प्रेमाचे
कुणास बोलावे
मनातले सारे
तुझ्या चाहुलीला आतुर मन माझे
तुझ्याविना आनंदाचे क्षण ओझे
गुंतवून विरले का हे धागे सुखाचे
असे एकटीने जीणे नको कधी
उनाड नात्याला नव्याने जोडावे
कुणास बोलावे
मनातले सारे
वाटे कधी विसरून सारे बिलगावे
तुझ्या सोबतीने मीही मिरवावे
सावरून तगमग सारी वेडया मनाची
असे आज फिरुनी मागे यावे कसे
बहर भेटीचे मनात मोजावे
कुणास बोलावे
मनातले सारे
कसे निराळे हे
करार प्रेमाचे
कुणास बोलावे
मनातले सारे
कसे निराळे हे
करार प्रेमाचे
कुणास बोलावे
मनातले सारे