Harvu Jara
तू चालता माझ्यासवे
भासे जणू सारे नवे
मन बावरे नेती जिथे
जग हे नवे आकारले
जुन्या क्षणांना रुजण्याचे वेड का
कसे कळेना ही लागे ओढ का
हरवुन भान सारे सजले उनाड वारे
विसरून आज सारे हरवू जरा
हरवुन भान सारे सजले उनाड वारे
विसरून आज सारे हरवू जरा
मुक्या पाकळ्यांना जुन्या सावल्यांना
हलके हलके खोल ना जरा
डोळे अंतरीचे जीवाला हवेसे
हलके हलके जोड ना जरा
हो भास पांघरून थोडे श्वास सावरून थोडे
स्वप्न तू नव्याने दे मला
मिठीत माझ्या दरवळतो तू नवा
जणू नभाच्या उराशी चांदवा
हरवुन भान सारे सजले उनाड वारे
विसरून आज सारे हरवू जरा
तुझ्या सोबतीने दूर दूर जावे
फुलते झुलते प्रीत ही जरा
तुला भेटण्याचे नव्याने बहाणे
फुलते झुलते रीत ही जरा
हो आज वाटते हसावे आज वाटते रुसावे
छंद हा सुखाचा वेगळा
मिठीत माझ्या दरवळतो तू नवा
जणू नभाच्या उराशी चांदवा
हरवुन भान सारे सजले उनाड वारे
विसरून आज सारे हरवू जरा