Haralo Viralo

हरलो विरलो प्रेमात पडलो तुझ्या
काय हा माझा गुन्हा
सलतो छलतो देतो दुरावा सजा
ठेच का लागे पुन्हा
हरवल्या सुखाच्या खुणा
हरवल्या सुखाच्या खुणा
तुझ्या विना
हरलो विरलो प्रेमात पडलो तुझ्या
काय हा माझा गुन्हा

सावली सोडून जाते
सोबती अंधार हा
सैरवैर या पावलांना
कोणती देऊ दिशा
भोवती गर्दी तरीही
जीव एकटा
सुना सुना
हरलो विरलो प्रेमात पडलो तुझ्या
काय हा माझा गुन्हा

शोधतो वळणा वरी त्या
सुटलेले हात मी
का भासतो श्वास परका
छळतात त्या आठवणी
उत्तरी चुकती नव्याने
प्रश्न तोच तो
जुना जुना
हरलो विरलो प्रेमात पडलो तुझ्या
काय हा माझा गुन्हा
सलतो छलतो देतो दुरावा सजा
ठेच का लागे पुन्हा
काय हा माझा गुन्हा
काय हा माझा गुन्हा हरलो

Músicas más populares de हृषिकेश रानडे

Otros artistas de Film score