Jeeva Shivachi Bail Jod

Yogesh

जिवा शिवाची बैल जोड़
लावली पैजला आपली पुढ

डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा
ये गा रामाच्या बानाचा र
ये ग बानाचा
तान्या सर्जाची हनाम जोड़ी .
तान्या सर्जाची हनाम जोड़ी
कुणा हवीत हाती घोडी माझ्या राजा र
कुणा हवीत हाती घोडी माझ्या राजा र

धरती आभाळाची चाक
त्याच्या दुलभेची हो गाड़ी
धरती आभाळाची चाक
त्याच्या दुलभेची हो गाड़ी
सूर्य चंद्राची हो जोड़ी
सूर्य चंद्राची हो जोड़ी
त्याच्या सर्गाची र माडी सर्गाची माडी
त्याच्या सर्गाची र माडी सर्गाची माडी
डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा
ये गा रामाच्या बानाचा र
ये ग बानाचा

सती संकराची माया
इस्‍नू लक्ष्मीचा राया
सती संकराची माया
इस्‍नू लक्ष्मीचा राया
पुरुस परकरतीची जोडी
पुरुस परकरतीची जोडी
डाव परपंचाचा मांडी माज्या राजा रं
डाव परपंचाचा मांडी माज्या राजा रं
डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा
ये गा रामाच्या बानाचा र
ये ग बानाचा

Músicas más populares de पं. हृदयनाथ मंगेशकर

Otros artistas de