Prawaas [Reprise]
मनासारखा ऋतू बदलतो वसंत फुलतो जणू शिशिरात
हो वळणानंतर गवसून जाते हवीहवीशी अनवट वाट
प्रवास प्रवास हा प्रवास
प्रवास हा प्रवास
गोड गुपित हे जगण्या मधले
वळणावरती उलघडते
हो सावरणारी सोबत असता जीवनगाणे दरवळते
हो सूरही उमलतो सुखाचा
हाती हात हलके मिसळता
ओ प्रवास प्रवास हा प्रवास
प्रवास प्रवास हा प्रवास
हा जुळून येति नवे तराणे
रंग नवे भरती जगण्यात
हो प्रवास होतो सुरेल सारा
हाती गुंतले असता हात
प्रवास प्रवास हा प्रवास
प्रवास प्रवास हा प्रवास