Swapne Manatali

Vasant Prabhu, P Savalaram

स्वप्ने मनातली का वाऱ्यावरी विरावी
का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी
स्वप्ने मनातली का

फिरलो तसाच मागे वचनात गुंतुनीही
नाही तसा परि मी ठावे तुला मलाही
ठावे तुला मलाही
माझी व्यथा अशी ही मज सांगता न यावी
का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी
स्वप्ने मनातली का

देऊन शब्द झाली प्रीतीच पाठमोरी
मी वंचिताच आता झाले जगासमोरी
झाले जगासमोरी
कोणी अशी कुणाची का वंचना करावी
का प्रीतिच्याच देवी ताटातुटी असावी
स्वप्ने मनातली का
ते दु:ख वेदना ती येथून पाहतो मी
त्या मूक आसवांचा आकांत साहतो मी
आकांत साहतो मी
फुलत्या वसंतकाळी का वीज कोसळावी
का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी
स्वप्ने मनातली का

Curiosidades sobre la música Swapne Manatali del सुमन कल्याणपुर

¿Quién compuso la canción “Swapne Manatali” de सुमन कल्याणपुर?
La canción “Swapne Manatali” de सुमन कल्याणपुर fue compuesta por Vasant Prabhu, P Savalaram.

Músicas más populares de सुमन कल्याणपुर

Otros artistas de Traditional music