Zombati Anga Jallahari
Snehal Bhatkar, G D Madgulkar
झोंबती अंगा जललहरी
झोंबती अंगा जललहरी
आमुची वसने दे श्रीहरी
आमुची वसने दे श्रीहरी
आमुची वसने दे श्रीहरी
पळे पळाली गेली घटका
पळे पळाली गेली घटका
पुरे खेळ हा अवखळ लटका
पुरे खेळ हा अवखळ लटका
परत जाऊ दे घरी
परत जाऊ दे घरी
आमुची वसने दे श्रीहरी
जात आमुची अशी लाजरी
जात आमुची अशी लाजरी
क्षणाक्षणाने पदर सावरी
क्षणाक्षणाने पदर सावरी
सुवेश असला तरी
सुवेश असला तरी
आमुची वसने दे श्रीहरी
जळात बुडले देह तरी हे
जळात बुडले देह तरी हे
उघडेपण मन विसरत नाही
उघडेपण मन विसरत नाही
लाज सले अंतरी
लाज सले अंतरी
आमुची वसने दे श्रीहरी
किती विनवावे किती रडावे
किती विनवावे किती रडावे
असेच वाटे जळी बुडावे
असेच वाटे जळी बुडावे
तूच सुबुद्धी धरी
तूच सुबुद्धी धरी
आमुची वसने दे श्रीहरी