Saanjh Aali Dooratun
Chandavarkar Bhaskar, Shanta Shelke
सांज आली दूरातून
सांज आली दूरातून क्षितिजाच्या गंधातून
सांज आली दूरातून
मनी नकार दाटले हात हातीचे सुटले
मागे वळून पाहता शब्दभाव सर्व पुसले
आले जीवन काळोखे सारे समोर दाटून
सारे समोर दाटून
सांज आली दूरातून क्षितिजाच्या गंधातून
सांज आली दूरातून
कळी कळी वेचताना अशी संध्याकाळ झाली
घराकडे वळणारी वाट अंधारी बुडाली
नामरूपहीन वृक्ष उभे भीती पांघरून
उभे भीती पांघरून
सांज आली दूरातून क्षितिजाच्या गंधातून
सांज आली दूरातून
आतबाहेर घेरून आल्या घनदाट छाया
चुकलेल्या गुरापरी जीव लागे हंबराया
कळी कळी वेचताना वेळ गेलीसे टळून
वेळ गेलीसे टळून
सांज आली दूरातून क्षितिजाच्या गंधातून
सांज आली दूरातून