Tu Nave Sur

तू नवे सूर जीवनीया
घेउनिया येना
आज आतुर ओंजळीला
चांदणे देना
बहरूदे दिनरात सुखाला
उमलत्या अलवार मनाला
दे तुझी चाहूल देना
तू नवे सूर जीवनीया
घेउनिया येना
आज आतुर ओंजळीला
चांदणे देना

बरसता आभाळ माझे
चिंब तू व्हावे
मिसळूनि माझ्यात माझे
अंग तू व्हावे
विसरुनी जग थांबलेल्या
अधीर या हळुवार क्षणाला
दे तुझी चाहूल देना
तू नवे सूर जीवनीया
घेउनिया येना
आज आतुर ओंजळीला
चांदणे देना

उजळण्या अंधार वाटा
हो नवा तारा
गंध वेडा अंगनिया
वाहू दे वारा
बिलगूनी पदरास तू माझ्या
रुजून या उदरातून माझ्या
दे तुझी चाहूल देना
तू नवे सूर जीवनीया
घेउनिया येना
आज आतुर ओंजळीला
चांदणे देना

Músicas más populares de बेला शेंडे

Otros artistas de Film score