Kashi Mi Jau Mathurechya Bajari

Guru Thakur

दही दुध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी
दही दुध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी
बावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरुन बाई
मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी
नटखट भारी किस्नमुरारी टपला यमुनातीरी
नटखट भारी किस्नमुरारी टपला यमुनातीरी
करतोय खोडी घागर फोडी जाऊ कशी चोरून बाई
मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी
हे नकोस फोडु कान्हा माझी घागर आज रिकामी
हे हसेल सारी गोकुळ नगरी होईल रं बदनामी
हे आज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे
रितीच घागर नशीबी माझ्या शरण तुला मी आले
देवा शरण तुला मी आले

वाट अडवून हसतो गाली ग
वेणु ऐकुन मोहित झाले
भान हरपून रमती गोपिका
श्यामरंगी न्हाऊन गेले
मन भुलवी असा कान्हा झुलवी असा
हा नटनागर गिरीधारी
त्याच्या संग दंगले रास रंगले
पिरतीची रीत न्यारी
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी

Músicas más populares de बेला शेंडे

Otros artistas de Film score