Anolkhi
ना कळे कसला प्रवास हा ?
का छळे शंका मनास ह्या ?
सारे विसरून ही
आठवते हेच की
सुटले काहीतरी केव्हातरी
जगताना श्वास ही
का भासतो परका अनोळखी
बघताना आरसा
चेहरा कसा दिसतो अनोळखी
हो ना कळे कसला प्रवास हा ?
का छळे शंका मनास ह्या ?
हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो
सैल होत चालली का
नात्यांची वीण ही ?
पैलतीर सापडेना
लाटांशी भांडुनी
भवताली फिरे सारे गोल
तोल जातो कसा खोल खोल ?
रूसलेले जगणे केव्हातरी
चुकताना वाट ही
तुटतो जसा तारा अनोळखी
निसटे हातातुनी वाळू
तसे क्षण हे अनोळखी
हो हो ना कळे शोधू कुठली दिशा ?
का छळे फसवा सवाल हा ?
सारे विसरून ही
आठवते हेच की
सुटले काहीतरी केव्हातरी
जगताना श्वास ही
का भासतो परका अनोळखी
बघताना आरसा
चेहरा कसा दिसतो अनोळखी
ना कळे !