He Paani Anile Mi Math Bharuni
एके दीवशी भरदुपारी पनवेल च्या नाक्यावरुन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मोटार भर वेगात चालली होती
बाबासाहेबांना खुप तहान लागली म्हणून ड्रायव्हरन जलळच्या हॉटेलसमोर गाडी थांबवली
बाबासाहेबांच्या समवेत असलेले त्यांचे सहकारी गडकरी पाणी आणायला गेले
बँरिस्टर आंबेडकरांना पाणी हवय हॉटेलच्या मालकान साफ नकार दीला
हॉटेलमालक उद्गारला महार बॅरिस्टरला पाणी मुळीच मिळणार नाही
हे शब्द सोनबा येलवे नावाच्या लाकुड तोडणाऱ्या माणसान ऐकले
धावत पळत तो घरी गेला स्वच्छ पाण्यान माट भरुन आणला
पण तेवढ्यात बाबासाहेबांची मोटार भर वेगान निघून सुद्धा गेली
बाबासाहेब पुन्हा या वाटेन येतील ते तसेच जाऊ नये
म्हणून आयुष्यभर त्या वाटेवर पाण्याचा माट भरुन सोनबा वाट पाहत उभा राहीला
तो संपला शेवटच्या क्षणापर्यंत तो बोलत होता
हे पाणी आणिले मी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आनिले मी
नव्हे मानसं सारीच सैतान ही
भीमबाबा यांना नाही मुळी जाण ही
नव्हे मानसं सारीच सैतान ही
भीमबाबा यांना नाही मुळी जाण ही
हे मोठ्या श्रद्धेनी
हे मोठ्या श्रद्धेनी आलो मी घेऊनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी
भर उन्हात व्याकूळ जीव थांबला
शब्द कर्मठांचा जिव्हारी तो झोंबला
भर उन्हात व्याकूळ जीव थांबला
शब्द कर्मठांचा जिव्हारी तो झोंबला
तो दाही दिशा पाही
तो दाही दिशा पाही टक लावूनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी
जीव जीवात हा होता त्याच्या जोवर
पाणी घेऊनि वाट पाहिली तोवर
जीव जीवात हा होता त्याच्या जोवर
पाणी घेऊनि वाट पाहिली तोवर
तो प्राण सोडिला
तो प्राण सोडिला बाबा म्हणूनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी
बोले सोनबा भीमबाबा येतील
पाणी घोटभर माझ्या हाती घेतील
बोले सोनबा भीमबाबा येतील
पाणी घोटभर माझ्या हाती घेतील
तो धन्य प्रभाकरा
तो धन्य प्रभाकरा वाट पाहूनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी