Shabdavina Othatale Kalale Mala
शब्दाविना ओठांतले
शब्दाविना ओठांतले कळले मला कळले तुला
शब्दाविना कळले मला
ओठांतले कळले मला
डोळ्यांतुनी हृदयातले
डोळ्यांतुनी हृदयातले कळले मला कळले तुला
डोळ्यांतुनी कळले मला
हृदयातले कळले मला
जुळले कधी धागे कसे जडले तुझे मजला पिसे
रात्रंदिनी ध्यानी-मनी मूर्ति तुझी हसरी दिसे
घडली कशी जादू अशी
घडली कशी जादू अशी स्वप्नातला झुलतो झुला
झुलतो झुला स्वप्नातला
स्वप्नातला झुलतो झुला
तू छेडियल्या तारांतुनी जन्मांस या स्वर लाभले
माझ्या-तुझ्या प्रीतीतुनी गाणे नवे झंकारले
गाणे नवे झंकारले
दाही दिशा भरुनी उरे
दाही दिशा भरुनी उरे आनंद या जगण्यातला
आनंद या जगण्यातला
कळले मला कळले तुला
शब्दाविना ओठांतले कळले मला कळले तुला
शब्दाविना कळले मला
ओठांतले कळले मला