Nako Aarti Ki Nako Pushpamala
नको आरती की नको पुष्पमाला
नको आरती की नको पुष्पमाला
प्रभू भोवताली असे व्यापलेला
नको आरती की नको पुष्पमाला
खगांच्या मुखाने प्रभू गाई गाणे
खगांच्या मुखाने प्रभू गाई गाणे
फुलांतून उधळी सुगंधी उखाणे
गगनांत फुलवी नवरंग लीला
नको आरती की नको पुष्पमाला
सदासर्वकाळी दुज्यांसाठी झिजतो
सदासर्वकाळी दुज्यांसाठी झिजतो
पुण्यवान जगती खरा तोच जगतो
त्यागात मनुजा उभा स्वर्ग भरला
नको आरती की नको पुष्पमाला
प्रकाशात फुलतो अंधार काळा
प्रकाशात फुलतो अंधार काळा
उन्हापाठी पळतो कसा पावसाळा
बुडे प्रेमरंगी कळे खेळ त्याला
नको आरती की नको पुष्पमाला
प्रभू भोवताली असे व्यापलेला
नको आरती की नको पुष्पमाला