Tinhi Sanja Sakhe Milalya
तीनी सांजा सखे मिळाल्या
तीनी सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला
तीनी सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला
आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला
तीनी सांजा सखे मिळाल्या
कनकगोल हा मरीचिमाली
कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा
चक्रवाल हे पवित्र ये जी शांत गभीर निशा
त्रिलोकगामी मारुत तैशा निर्मल दाहि दिशा
साक्षी ऐसे अमर करुनी हे तव कर करी धरिला
तीनी सांजा सखे मिळाल्या
नाद जसा वेणूंत हो हो रस जसा सुंदर कवनांत
गंध जसा सुमनांत रस जसा बघ या द्राक्षांत
पाणी जसे मोत्यांत
पाणी जसे मोत्यांत मनोहर वर्ण सुवर्णांत
मनोहर वर्ण सुवर्णांत
हृदयीं मी साठवीं तुज तसा जीवित तो मजला
तीनी सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला
तीनी सांजा सखे मिळाल्या