Son Sakali Sarja

Anandghan, Shanta Shelke

सोन सकाळी सर्जा सजला
हसलं हिरवं रान
राघुमैना रानपाखरं
गाउ लागली गान

झुळुझुळु आला पहाटवारा
आ आ झुळुझुळु आला पहाटवारा
हळुच जागवी उभ्या शिवारा
हळुच जागवी उभ्या शिवारा
झाडं येली नीज सांडती
नाचनाचतं पान
राघुमैना रानपाखरं
गाउ लागली गान

ओं नमः शिवाय
पिढ्यापिढ्यांचं पातक सरलं (ओं नमः शिवाय)
शिवनेरीला शिव अवतरलं
शिवरायांच्या मंगल चरणी (ओं नमः शिवाय)
पावन झाली अवघी धरणी

शिवरायांच्या मंगल चरणी आ आ
शिवरायांच्या मंगल चरणी
पावन झाली अवघी धरणी
पावन झाली अवघी धरणी
जयभवानी बोल गर्जती
जयभवानी जयभवानी जयभवानी जयभवानी
हो जयभवानी बोल गर्जती
आज पाचही प्राण
जयभवानी बोल गर्जती
आज पाचही प्राण
जयभवानी बोल गर्जती
आज पाचही प्राण

Curiosidades sobre la música Son Sakali Sarja del Lata Mangeshkar

¿Quién compuso la canción “Son Sakali Sarja” de Lata Mangeshkar?
La canción “Son Sakali Sarja” de Lata Mangeshkar fue compuesta por Anandghan, Shanta Shelke.

Músicas más populares de Lata Mangeshkar

Otros artistas de Film score