Shoor Amhi Sardar

Anand Ghan, Shanta Shelke

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
देव देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीती
लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती
देव देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती

जिंकावेवा वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं
जिंकावेवा वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं
लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी सारी विसरू माया ममता नाती
देव देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती

Curiosidades sobre la música Shoor Amhi Sardar del Lata Mangeshkar

¿Quién compuso la canción “Shoor Amhi Sardar” de Lata Mangeshkar?
La canción “Shoor Amhi Sardar” de Lata Mangeshkar fue compuesta por Anand Ghan, Shanta Shelke.

Músicas más populares de Lata Mangeshkar

Otros artistas de Film score