Sakhi Ga Murali
सखी गं मुरलीमोहन मोही मना
सखी गं मुरलीमोहन मोही मना
गाऊ किती पुन्हा पुन्हा त्याच्या गुणा
सखी गं मुरलीमोहन मोही मना
सखी गं सखी मुरलीमोहन मोही मना
शृंगाराची प्रीत करिता चिंतन
अनुराग त्याचा देता आलिंगन
अनुराग त्याचा देता आलिंगन
चंदनाचा गंध येतसे पंचप्राणा
चंदनाचा गंध येतसे पंचप्राणा
मोही मना सखी गं मुरलीमोहन मोही मना
सखी गं मुरलीमोहन मोही मना
कानी येता ज्याच्या बासुरीचे सूर
कानी येता ज्याच्या बासुरीचे सूर
कालिंदीला येता आनंदाचा पूर
गोपिकांच्या घरी प्रीतीचा पाहुणा गं
गोपिकांच्या घरी प्रीतीचा पाहुणा गं
सखी गं सखी मुरलीमोहन मोही मना