Prema Kay Devu Tula

Vasant Prabhu, P Savalaram

प्रेमा, काय देऊ तुला?
भाग्य दिले तू मला
भाग्य दिले तू मला

प्रीतीच्या या पाखराचे
प्रीतीच्या या पाखराचे
रत्‍नकांचनी पंख देऊ का
प्रीतीच्या या पाखराचे
रत्‍नकांचनी पंख देऊ का
देऊ तुला का हर्षगंध हा
जीव फुलातून मोहरलेला
भाग्य दिले तू मला
भाग्य दिले तू मला

या हृदयीच्या जलवंतीची
या हृदयीच्या जलवंतीची
निळी ओढ ती तुला हवी का
रूपमोहिनी लावण्याची
हवी तुझ्या का चंद्रकलेला
भाग्य दिले तू मला
भाग्य दिले तू मला

मोहक सुंदर जे जे दिसते,
मोहक सुंदर जे जे दिसते,
तूच तयांचा जन्मदाता
घेशील का रे माझ्याकरिता
अधरीच्या या अमृताला
भाग्य दिले तू मला
प्रेमा, काय देऊ तुला?
भाग्य दिले तू मला
भाग्य दिले तू मला

Curiosidades sobre la música Prema Kay Devu Tula del Lata Mangeshkar

¿Quién compuso la canción “Prema Kay Devu Tula” de Lata Mangeshkar?
La canción “Prema Kay Devu Tula” de Lata Mangeshkar fue compuesta por Vasant Prabhu, P Savalaram.

Músicas más populares de Lata Mangeshkar

Otros artistas de Film score