Prem Swarup Aai

MADHAV JULIAN, VASANT PRABHU

प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधु आई
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी
प्रेमस्वरूप आई

नाही जगात झाली आबाळ या जीवाची
नाही जगात झाली आबाळ या जीवाची
तुझी उणीव चित्ती आई तरीहि जाची
चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका
प्रेमस्वरूप आई

ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनाही
वाटे इथूनी जावे तुझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे
प्रेमस्वरूप आई

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके
वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके
घे जन्म तू फिरूनी येईन मीहि पोटी
खोटी ठरो न देवा हि एक आसं मोठ्ठी
प्रेमस्वरूप आई आई

Curiosidades sobre la música Prem Swarup Aai del Lata Mangeshkar

¿Quién compuso la canción “Prem Swarup Aai” de Lata Mangeshkar?
La canción “Prem Swarup Aai” de Lata Mangeshkar fue compuesta por MADHAV JULIAN, VASANT PRABHU.

Músicas más populares de Lata Mangeshkar

Otros artistas de Film score