Neej Mazya Nandlala

MANGESH PADGAOKAR, SHRINIVAS KHALE

नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे

नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे
नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे
शांत हे आभाळ सारे शांत हे आभाळ सारे
शांत तारे शांत वारे शांत तारे शांत वारे
या झर्याचा सूर आता मंद झाला मंद झाला रे
नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे

झोपल्या गोठयात गाई साद वा पडसाद नाही
झोपल्या गोठयात गाई साद वा पडसाद नाही
पाखरांचा गलबला ही बंद झाला बंद झाला रे
नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे

सावल्यांची तीट गाली सावल्यांची तीट गाली
चांदण्याला नीज आली चांदण्याला नीज आली
रातराणीच्या फुलांचा गंध आला गंध आला रे
नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे

नीज रे आनंदकंदा नीज रे माझ्या मुकुंदा
नीज रे आनंदकंदा नीज रे माझ्या मुकुंदा
आवरी या घागर्यांचा छंदताला छंदताला रे
नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे
नंदलाला रे

Curiosidades sobre la música Neej Mazya Nandlala del Lata Mangeshkar

¿Quién compuso la canción “Neej Mazya Nandlala” de Lata Mangeshkar?
La canción “Neej Mazya Nandlala” de Lata Mangeshkar fue compuesta por MANGESH PADGAOKAR, SHRINIVAS KHALE.

Músicas más populares de Lata Mangeshkar

Otros artistas de Film score