Nashib Shikandar Majhen

Vasant Prabhu, P Savlaram

नशीब शिकंदर माझे राज्यपद आले
पट्टराणी तुमची मी झाले तुम्ही महाराजे
नशीब शिकंदर माझे राज्यपद आले
पट्टराणी तुमची मी झाले तुम्ही महाराजे

कोहिनूर हिर्यांमधी हिरा
फुलांमध्ये फूल मोगरा
कोहिनूर हिर्यांमधी हिरा
फुलांमध्ये फूल मोगरा
लाखो राजात राजेश्वरा
लाखो राजात राजेश्वरा
नवकोट मोत्यांचा तुरा
नवकोट मोत्यांचा तुरा मंदिली साजे
पट्टराणी तुमची मी झाले तुम्ही महाराजे

सोन्याचे कळस गोपुरी
सोन्याचे कळस गोपुरी
झळकती राज्यमंदिरी
झळकती राज्यमंदिरी
स्वारी आली तुमची दरबारी
स्वारी आली तुमची दरबारी
पंचखंडात होई ललकारी
पंचखंडात होई ललकारी चौघडा वाजे
पट्टराणी तुमची मी झाले तुम्ही महाराजे

नशीब शिकंदर माझे राज्यपद आले
पट्टराणी तुमची मी झाले तुम्ही महाराजे
रत्नमण्यांच्या सिंहासनी हो हो
रत्नमण्यांच्या सिंहासनी
तुम्ही इंद्र मी इंद्रायणी
तुम्ही इंद्र मी इंद्रायणी
कुबेरानं दिली खंडणी
कुबेरानं दिली खंडणी
देव उभे हात जोडुनी
देव उभे हात जोडुनी मांडलिक राजे
पट्टराणी तुमची मी झाले तुम्ही महाराजे

नशीब शिकंदर माझे राज्यपद आले
पट्टराणी तुमची मी झाले तुम्ही महाराजे

Curiosidades sobre la música Nashib Shikandar Majhen del Lata Mangeshkar

¿Quién compuso la canción “Nashib Shikandar Majhen” de Lata Mangeshkar?
La canción “Nashib Shikandar Majhen” de Lata Mangeshkar fue compuesta por Vasant Prabhu, P Savlaram.

Músicas más populares de Lata Mangeshkar

Otros artistas de Film score