Mi Katyatun Chalun Thakle

N. D. Mahanor

आर थांब, चल हट्ट
राया थांब ना अगं गप सर्जा थांब ना
मी काट्यातून चालून थकले
मी काट्यातून चालून थकले
तू घोड्यावर भरदारी
तू घोड्यावर भरदारी
माझ्या ढोलावरी जीत ही
माझ्या ढोलावरी जीत ही
नगं दाखवू तू शिरजोरी
नगं दाखवू तू शिरजोरी ओ

तू निमताला ढोल वाजवित
तू निमताला ढोल वाजवित
झिंग चढली मला न्यारी
झिंग चढली मला न्यारी
डोंगरमाथा जिंकून आलो
डोंगरमाथा जिंकून आलो
बळ मुठीत या भारी
बळ मुठीत या भारी
मी काट्यातून चालून थकले
मी काट्यातून चालून थकले

दिमाख नस्ता नगं दाखवू
घोड्यावरती येड्या थाटोनी
तू मावळच्या राजा जैसा
मी ह्या मातीची महाराणी
मी ह्या मातीची महाराणी
मी ह्या मातीची महाराणी
नगं दाखवू तू शिरजोरी
नगं दाखवू तू शिरजोरी
मी काट्यातून चालून थकले
मी काट्यातून चालून थकले

नगं रुसू कस्तुरी
तुझ्याविन कशी जिवाची मनकरणी
घोड्यांच्या टापांनी उखरू
मावळ माथ्याचं पाणी
घोड्यांच्या टापांनी उखरू
घोड्यांच्या टापांनी उखरू
मावळ माथ्याचं पाणी
मावळ माथ्याचं पाणी
मी मर्दाची रानी झाले
मी मर्दाची रानी झाले

दोरीवरल्या झोपाळ्याचा
झोका गेला गेला भिंगोरी
डोंगरमाथा कवेत घेऊ
सर्जा माझ्या राया माजोरी
डोंगरमाथा कवेत घेऊ
डोंगरमाथा कवेत घेऊ
सर्जा माझा माजोरी
सर्जा माझा माजोरी
मी वाऱ्याशी बोलून आले
मी वाऱ्याशी बोलून आले (ओ माझ्या सर्जा हा हा हा वार राजा ओओ सर्जा )

ह्या शेताच्या मातीमधला
गंध पिकातून निखरोनी
हिरव्या झाडातूनी झळकली
लखलख तेजाची लेणी
हिरव्या झाडातूनी झळकली
हिरव्या झाडातूनी झळकली
लखलख तेजाची लेणी
लखलख तेजाची लेणी
मन पाखरू धुंद झाले
मन पाखरू धुंद झाले

Curiosidades sobre la música Mi Katyatun Chalun Thakle del Lata Mangeshkar

¿Quién compuso la canción “Mi Katyatun Chalun Thakle” de Lata Mangeshkar?
La canción “Mi Katyatun Chalun Thakle” de Lata Mangeshkar fue compuesta por N. D. Mahanor.

Músicas más populares de Lata Mangeshkar

Otros artistas de Film score