मनासारखे झाले
जादुगिरी ही कोणी केली कळुनी नाही आले
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले
मज कळले नाही काही
मी कधी पाहिले त्यांना
मी कधी पाहिले त्यांना
मज कळले नाही बाई
मी काय बोलले त्यांना
मी काय बोलले त्यांना आ आ
हसले माझे ओठ म्हणू की हसले माझे डोळे
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले
ते सद्गुण की ते रूप ते रूप
ते सद्गुण की ते रूप आ आ
मज काय नेमके रुचले रुचले
ते निसर्गजीवन दिसता बाई दिसता
मज काय नेमके सुचले सुचले
माया-ममता माझ्याभवती विणती कैसे जाळे
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले
हे वेड अनामिक आहे आ आ
की अधीरता ही मनची
उघड्याच लोचनी दिसती बाई दिसती
स्वप्ने ही जागेपणची
मला न कळता माझ्या हाती
साज असा हा ल्याले
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले