Hasale Ga Bai Hasale

P. SAVALARAM, VASANT PRABHU

हसले गं बाई हसले
अन् कायमची मी फसले
हसले गं बाई हसले
अन् कायमची मी फसले

नयनकवडसा टाकून कुणीतरी
नयनकवडसा टाकून कुणीतरी
दिपवी माझे लबाड डोळे
दिपवी माझे लबाड डोळे
प्रीत मधाचे सुंदर पोळे
प्रीत मधाचे सुंदर पोळे
हृदयी शिरुनी चोरुन नेले हो
हसले गं बाई हसले
अन् कायमची मी फसले

सांगायाची चोरी झाली
सांगायाची चोरी झाली
आई विचारी काय जहाले
आई विचारी काय जहाले
चिडले रुसले माझ्यावर मी
चिडले रुसले माझ्यावर मी
मलाच होते हरवुन बसले हो
हसले गं बाई हसले
अन् कायमची मी फसले

पाळत ठेवुन त्या लुच्च्याला
पाळत ठेवुन त्या लुच्च्याला
धरुनी बांधून खेचित नेले
धरुनी बांधून खेचित नेले
वाजत गाजत कैदी केले
वाजत गाजत कैदी केले
शासन करता घरास मुकले हो
हसले गं बाई हसले
अन् कायमची मी फसले

Curiosidades sobre la música Hasale Ga Bai Hasale del Lata Mangeshkar

¿Quién compuso la canción “Hasale Ga Bai Hasale” de Lata Mangeshkar?
La canción “Hasale Ga Bai Hasale” de Lata Mangeshkar fue compuesta por P. SAVALARAM, VASANT PRABHU.

Músicas más populares de Lata Mangeshkar

Otros artistas de Film score