Thambate Mee Roj Yethe

Davjekar Datta

थांबते मी रोज येथे जी तुझ्यासाठी
बोलणे ना बोलणे रे ते तुझ्या हाती
थांबते मी रोज येथे जी तुझ्यासाठी

मधुर स्वप्ने मीलनाची लाविती मज वेड का ती
रंगवीण्या स्वप्न माझे
रंगवीण्या स्वप्न माझे पाहिजे मज तूच रे
रंगणे ना रंगवीणे ते तुझ्या हाती
थांबते मी रोज येथे जी तुझ्यासाठी

अळविती मजला तया मी टाकिते झिडकारुनी
अळविती मजला तया मी टाकिते झिडकारुनी
अळविते तुज तान भरुनी याचनेची रागिणी
ऐकणे ना ऐकणे रे ते तुझ्या हाती
थांबते मी रोज येथे जी तुझ्यासाठी

उपवनी सुमने उमलती भ्रमर ते मधुगंध लुटती
हृदय-पुष्प तुला दिले जे एकदा उमले
हृदय-पुष्प तुला दिले जे एकदा उमले
चुंबिणे ना चुंबिणे रे ते तुझ्या हाती
थांबते मी रोज येथे जी तुझ्यासाठी

Curiosidades sobre la música Thambate Mee Roj Yethe del Asha Bhosle

¿Quién compuso la canción “Thambate Mee Roj Yethe” de Asha Bhosle?
La canción “Thambate Mee Roj Yethe” de Asha Bhosle fue compuesta por Davjekar Datta.

Músicas más populares de Asha Bhosle

Otros artistas de Pop rock