Mhane Yashoda Majha Kanha

Vasant Prabhu, P Ram Savala

म्हणे यशोदा माझा कान्हा म्हणे देवकी माझा तान्हा
तो तर होता बाळरूप हरी वैकुंठीचा राणा
वैकुंठीचा राणा
म्हणे यशोदा माझा कान्हा

चंद्रसूर्यही कधि न मावळे आनंदाचे इकडे गोकुळ
सुखदुखाचा पाऊस जेथे मथुरा तिकडे वत्सल व्याकूळ
मधुनी वाहत भरूनी प्रेमळ
मधुनी वाहत भरूनी प्रेमळ ती मायेची जमुना
ती मायेची जमुना
म्हणे यशोदा माझा कान्हा

देठावरची दोन फुले तशी मायेची ती दोन मने
दो आईच्या या बाळाला काय कमी हो काय उणे
विश्वमाऊली घेत चुंबने
विश्वमाऊली घेत चुंबने पाजित अमृत पान्हा
पाजित अमृत पान्हा
म्हणे यशोदा माझा कान्हा

नक्षत्रांचे राघुमोर ते झुले पाळणा स्वर्गधरेचा
घुंगुरवाळा वाजत पायी मेळ नाचत गौळणींचा
झोका आला तो मथुरेचा
झोका आला तो मथुरेचा नाव ठेवा कृष्ण म्हणा
नाव ठेवा कृष्ण म्हणा
म्हणे यशोदा माझा कान्हा म्हणे देवकी माझा तान्हा
तो तर होता बाळरूप हरी वैकुंठीचा राणा
वैकुंठीचा राणा
म्हणे यशोदा माझा कान्हा

Curiosidades sobre la música Mhane Yashoda Majha Kanha del Asha Bhosle

¿Quién compuso la canción “Mhane Yashoda Majha Kanha” de Asha Bhosle?
La canción “Mhane Yashoda Majha Kanha” de Asha Bhosle fue compuesta por Vasant Prabhu, P Ram Savala.

Músicas más populares de Asha Bhosle

Otros artistas de Pop rock