Mhan Re Sakhya Too Maj Apuli
म्हण भाबडी, म्हण तू खुळी
म्हण रे सख्या तू मज आपुली
म्हण रे सख्या तू मज आपुली
जिवास सदया तुझ्या लगटुनी
श्वासांमाजी श्वास मिसळुनी
रूळत रहावा मानेवरुनी
रूळत रहावा मानेवरुनी
मृदू रेशमी कर कर्दळी
म्हण भाबडी, म्हण तू खुळी
म्हण रे सख्या तू मज आपुली
म्हण रे सख्या तू मज आपुली
तव बाहुंच्या क्षितिजामधले
तव बाहुंच्या क्षितिजामधले
जग दोघांचे मीच निर्मिले
डोळस माझे प्रेम आंधळे
जडले मन रे पडले गळी
म्हण भाबडी, म्हण तू खुळी
म्हण रे सख्या तू मज आपुली
म्हण रे सख्या तू मज आपुली
पुरुष जातही फसवी बाई
म्हणणारे कुणी म्हणोत काही
फसव हवे तर तूच मला ही
फसव हवे तर तूच मला ही
उडी घेतली मोहजळी
म्हण भाबडी, म्हण तू खुळी
म्हण रे सख्या तू मज आपुली
म्हण रे सख्या तू मज आपुली