Maay Dhartichya Daari
गोंडा फुटला दिसाचा जसं जास्वंदीचं फूल
माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल
माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल
माय माय म्हणताना सय माउलीची आली
माउलीच्या मागं मला दादा तुझीच साउली
देह नांदतो सासरी मन माहेरा निघालं
माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल
भाऊ माझा तालेवार बारा बैल दावणीला
भाऊ माझा तालेवार बारा बैल दावणीला
उभा पाठीशी सावळा काय उणं बहिणीला
काय उणं बहिणीला
सार्या गावाहून चढं असं धनत्तर कूळ
माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल
माझं मागणं ते किती तुझं देणं भारंभार
माझी चोळीची रे आशा तुझा जरीचा पदर
झोपडीला या आधार दादा तुझं रे राऊळ
माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल