Jhini Jhini Vaaje Been

B B BORKER, SHRIDHAR PHADKE

झिणि झिणी वाजे बीन
झिणि झिणी वाजे बीन
सख्या रे अनुदिन चीज नविन
झिणि झिणी वाजे बीन
झिणि झिणी वाजे बीन
सख्या रे अनुदिन चीज नविन
झिणि झिणी वाजे बीन

कधी अर्थावीण सुभग तराणा
कधी मंत्रांचा भास दिवाणा
कधी अर्थावीण सुभग तराणा
कधी मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधी केविलवाणा
सूर सुना कधी केविलवाणा शरणागत अतिलीन
शरणागत अतिलीन
सख्या रे झिणि झिणी वाजे बीन
झिणि झिणी वाजे बीन

कधी खटका कधी रुसवा लटका
छेडी कधी प्राणांतिक घटका
कधी खटका कधी रुसवा लटका
छेडी कधी प्राणांतिक घटका
कधी जीवाचा तोडून लचका
कधी जीवाचा तोडून लचका
घेते फिरत कठीन
घेते फिरत कठीन
सख्या रे झिणि झिणी वाजे बीन
झिणि झिणी वाजे बीन

सौभाग्ये या सुरात तारा
त्यातून अचपळ खेळे पारा
सौभाग्ये या सुरात तारा
त्यातून अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा
अलख निरंजन वाजविणारा सहजपणात प्रविण
सहजपणात प्रविण
सख्या रे झिणि झिणी वाजे बीन
झिणि झिणी वाजे बीन
सख्या रे अनुदिन चीज नविन
झिणि झिणी वाजे बीन
झिणि झिणी वाजे बीन

Curiosidades sobre la música Jhini Jhini Vaaje Been del Asha Bhosle

¿Quién compuso la canción “Jhini Jhini Vaaje Been” de Asha Bhosle?
La canción “Jhini Jhini Vaaje Been” de Asha Bhosle fue compuesta por B B BORKER, SHRIDHAR PHADKE.

Músicas más populares de Asha Bhosle

Otros artistas de Pop rock