Chand Kiranano

G D Madgulkar, Kadam Ram

आ आ आ आ आ आ आ आ आ
चांद किरणांनो
चांद किरणांनो जा जा रे माझ्या माहेरा
जा जा जा जा जा रे माझ्या माहेरा
फुले प्रकाशाची माझ्या दारी अंथरा
जा जा रे माझ्या माहेरा
जा जा जा जा जा रे माझ्या माहेरा

हळू चढा खिडकीत पहा डोकावुनी आत
मूर्त माऊलीची माझ्या न्याहळा जरा
जा जा जा रे माझ्या माहेरा
जा जा जा जा जा रे माझ्या माहेरा

पाडसाची चिंता माथी करी विरक्तीची पोथी
डोळ्यांतुनी आसवांचा पाझरे झरा
जा जा जा रे माझ्या माहेरा
चांद किरणांनो
जा जा जा जा जा रे माझ्या माहेरा

टांगलेली छायाचित्र देवासारखे पवित्र
स्वर्गवासी माझे बाबा रक्षिती घरा
जा रे माझ्या माहेरा
जा जा जा रे माझ्या माहेरा

पलीकडे खाटेवरी भर मध्यान्हीच्या पारी
दिव्यातली भाऊराया वाची अक्षरा
जा रे माझ्या माहेरा
चांद किरणांनो
जा जा जा जा रे माझ्या माहेरा

Curiosidades sobre la música Chand Kiranano del Asha Bhosle

¿Quién compuso la canción “Chand Kiranano” de Asha Bhosle?
La canción “Chand Kiranano” de Asha Bhosle fue compuesta por G D Madgulkar, Kadam Ram.

Músicas más populares de Asha Bhosle

Otros artistas de Pop rock