Bharjari Ga Pitambar [With Commentary]
तुम्ही शिरीष पै आचार्य अत्रे यांची कन्या
आज आपल्या पुढं त्यांच्या चित्रपट गीतांची ध्वनीफीत सादर करीत आहे
आचार्य अत्रे यांचं मराठी चित्रपट श्रुष्टि मधलं स्थान
हे एकमेवा द्वितीय असच म्हणावं लागेल
कारण त्यांनी निर्माण केलेल्या
श्याम ची आई या एकाच मराठी चित्रपटाला राष्ट्रपतीच
पाहिलं सुवर्ण पदक पटकावण्याचा मान मिळाला
भरजरी ग पितांबर दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली
सुभद्रा बोलली शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हांसी मी
पाठची बहीण झाली वैरिण
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
भरजरी ग पितांबर दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
द्रौपदी बोलली हरिची मी कोण
परि मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभु राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
भरजरी ग पितांबर दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण