Jai Jai Shri Shanideva - Aarti

जय जय श्री शनीदेवा पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळितो मनोभावे करुनी सेवा
जय जय श्री शनीदेवा
सुर्यसुता शनिमूर्ती तुझी अगाध कीर्ति
एकमुखे काय वर्णू शेषा न चले स्फुर्ती
जय जय श्री शनीदेवा
नवग्रहांमाजी श्रेष्ठ पराक्रम थोर तुझा
ज्यावरी तू कृपा करिसी होय रंकाचा राजा
जय जय श्री शनीदेवा
विक्रमासारिखा हो शककरता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली बहु छळीयेले त्यासी
जय जय श्री शनीदेवा
शंकराच्या वरदाने गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी समूळ नाशासी नेला
जय जय श्री शनीदेवा
प्रत्यक्ष गुरुनाथ चमत्कार दावियेला
नेऊनि शुळापाशी पुन्हा सन्मान केला
जय जय श्री शनीदेवा
ऐसे गुण किती गाऊ धणी न पुरे गातां
कृपा करि दिनांवरी महाराजा समर्था
जय जय श्री शनीदेवा
दोन्ही कर जोडनियां रुक्मालीन सदा पायी
प्रसाद हाची मागे उदय काळ सौख्यदावी
जय जय श्री शनीदेवा
जय जय श्री शनीदेवा पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळीतो मनोभावे करुनी सेवा
जय जय श्री शनीदेवा

Músicas más populares de Anuradha Paudwal

Otros artistas de Film score