Ghana Shyam(From Kaiwari)

घनश्याम सावळा स्मरता डोळे भरती
हा राग म्हणू की रुसवा माझ्यावरती
घनश्याम सावळा स्मरता डोळे भरती
हा राग म्हणू की रुसवा माझ्यावरती
हा राग म्हणू की रुसवा माझ्यावरती
घनश्याम सावळा

कुंजात मोहना तू मधुगुंजन केले
लहरीत स्वरांच्या विरघळून मी गेले
कुंजात मोहना तू मधुगुंजन केले
लहरीत स्वरांच्या विरघळून मी गेले
का अमृतधारा
का अमृतधारा रूप विषाचे धरती
हा राग म्हणू की रुसवा माझ्यावरती
हा राग म्हणू की रुसवा माझ्यावरती
घनश्याम सावळा

विरहात चांदणे हृदय जाळिते माझे
तुजवाचून आता जिणेच झाले ओझे
विरहात चांदणे हृदय जाळिते माझे
तुजवाचून आता जिणेच झाले ओझे
या भावभावना
या भावभावना कणाकणाने झुरती
हा राग म्हणू की रुसवा माझ्यावरती
हा राग म्हणू की रुसवा माझ्यावरती
घनश्याम सावळा

एकान्त शून्य हा मीच बंदिनी झाले
हे स्वप्न सुखाचे आसवांत या न्हाले
एकान्त शून्य हा मीच बंदिनी झाले
हे स्वप्न सुखाचे आसवांत या न्हाले
आभास मनाचे
आभास मनाचे सरले तरीही उरती
हा राग म्हणू की रुसवा माझ्यावरती
घनश्याम सावळा

Músicas más populares de Anuradha Paudwal

Otros artistas de Film score