Chaandanyaat Jhoolto Bai

Pravin Davane

चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा
चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा
चांदण्यात झुलतो बाई

पीस मयूरी अलगद हे या हृदयातूनी
पहिली प्रीती साद घालिते या गाण्यातूनी
पीस मयूरी अलगद हे या हृदयातूनी
पहिली प्रीती साद घालिते या गाण्यातूनी
निळावल्या स्वप्नांचा मोर नाचरा
चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा
चांदण्यात झुलतो बाई

मोहरल्या वाटा आता मंतरली राने
हुरहुरल्या शपथा येथे झुरमुरली पाने
मोहरल्या वाटा आता मंतरली राने
हुरहुरल्या शपथा येथे झुरमुरली पाने
अधरांचा स्पर्शांचा भास बावरा हो
चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा
चांदण्यात झुलतो बाई

तळहातावर भिजली मेंदी स्वप्न होऊनी
ओठांवरती रुजले गाणे
जन्म होऊनी
जन्म होऊनी
ध्यासांचा ओ ओ
भासांचा
ध्यासांचा भासांचा
गोड भोवरा
चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा
चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा
चांदण्यात झुलतो बाई

Curiosidades sobre la música Chaandanyaat Jhoolto Bai del Anuradha Paudwal

¿Quién compuso la canción “Chaandanyaat Jhoolto Bai” de Anuradha Paudwal?
La canción “Chaandanyaat Jhoolto Bai” de Anuradha Paudwal fue compuesta por Pravin Davane.

Músicas más populares de Anuradha Paudwal

Otros artistas de Film score