Aarti Shri Swami Samarthachi
जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा
छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी
तु अवतरलासी
जग्दउध्दारासाठी
जग्दउध्दारासाठी राया तु फिरसी
भक्तवत्सल खरा तु एक होसी
तु एक होसी
म्हणुनी शरण आलो
म्हणुनी शरण आलो तुझे चरणासी
जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार
तुझा अवतार
त्याची काय वर्णु
त्याची काय वर्णु लिला पामर
शेशादिक क्षीणले नलगे त्या पार
नलगे त्या पार
तेथे जडमुढ कैसा
तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार
जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा
देवाधिदेवा तु स्वामी राया
तु स्वामी राया
निरजर मुनीजन ध्याती
निरजर मुनीजन ध्याती भावे तव पाया
तुझसी अर्पण केली आपुली ही काया
आपुली ही काया
शरणागता तारी
शरणागता तारी तु स्वामी राया
जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा
अघटीत लिला करुनी जडमुढ उध्दारिले
जडमुढ उध्दारिले
किर्ती एकूनी कानी
किर्ती एकूनी कानी चरणी मी लोळे
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले
मज हे अनुभवले
तुझ्या सुता नलगे
तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे
जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा