Udhava Ajab Tuze Sarkar
उद्धवा आ आ अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार
लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार
अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार
इथे फुलांना मरण जन्मता दगडांना पण चिरंजिवीता
इथे फुलांना मरण जन्मता दगडांना पण चिरंजिवीता
बोरी बाभळी उगाच जगती चंदन माथी कुठार
अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार
लबाड जोडिती इमले माड्या आ आ आ
लबाड जोडिती इमले माड्या गुणवतांना मात्र झोपडया
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार
अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार
वाईट तितके इथे पोसले भलेपणाचे भाग्य नासले
वाईट तितके इथे पोसले भलेपणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार
अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार