Narada Munivara
नारदा मुनिवरा
नारदा मुनिवरा तुझे मी गाता गौरवगीत
रंगले हरिभजनी संगीत
रंगले हरिभजनी संगीत
नारदा
गळ्यांत वीणा चिपळ्या हाती
सदा वसे नारायण ओठी
सदा वसे नारायण ओठी
अवतारुनी तू क्षणोक्षणी रे
अवतारुनी तू क्षणोक्षणी साधिसी जगाचे हीत
तुझे मी गाता गौरवगीत
रंगले हरिभजनी संगीत
रंगले हरिभजनी संगीत
नारदा
दोन खडावा पवित्र पायी
शिखा शिरी शोभे शुभदायी
दोन खडावा पवित्र पायी
शिखा शिरी शोभे शुभदायी
कधी कुठे कळ लावुनी रे
कधी कुठे कळ लावुनी करिसी मति अमुची कुंठित
तुझे मी गाता गौरवगीत
रंगले हरिभजनी संगीत
रंगले हरिभजनी संगीत
नारदा
त्रिभुवनी तू रचुनी कावा
सत्कार्याते घेउनि धांवा घेउनि धांवा
चराचरासी तारण्यास रे
चराचरासी तारण्यास व्रतकैवल्ये दावीत
तुझे मी गाता गौरवगीत
रंगले हरिभजनी संगीत
नारदा मुनिवरा तुझे मी गाता गौरवगीत
रंगले हरिभजनी संगीत
रंगले हरिभजनी संगीत
नारदा