BABASAHEB ZINDABAAD
AMOL KADAM
कीर्तिवंत तू, जगी दिव्य प्रभरत्न
सफल केले जिद्दीने, सारे तू प्रयत्न,
तुझी विचारधारा, अखंडतेचा नारा
आसमंती घुमे हा निनाद,
स्पंदनांची पुकारे साद,
बाबासाहेब जिंदाबाद
शेतकरी कामगार दीनदुबळा तुझ्याच पाठी,
माहिलांना आवाज दिला सोडवून रूढीच्या गाठी,
नदी जोड प्रकल्प तुझा, पाण्याच्या नियोजनासाठी
रुपयाच्या प्रश्नाचे सारे उत्तर तुझ्याच हाती
नव्या दिशेचा आधुनिक भारत,
तोच आंबेडकरवाद
स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब जिंदाबाद
सत्याग्रही दर्जेदार, भाषण हे तुझ्याच ओठी
संपविण्या जातिवादाला, लावलीस ज्ञानाची कसोटी,
प्रेम बंधुभाव सदा बुद्धाशी जोडतो नाती
मानवतेसाठी लढा शिकवीते संघर्ष ख्याती,
ओढतो अवीरत प्रगतीचा हा रथ,
बुद्धीशी साधुनी संवाद
स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब जिंदाबाद