Yachaka Thambun Nako Darant

Sudhir Phadke, G D Madgulkar

सीतेच्या हट्टासाठी श्रीराम धुनुष्य बाण घेऊन त्या मृगाचा मागोवा घेत धावले
रामाचा बाण वर्मी लागताच तोच मायावी मारीज
हा सीते हा लक्ष्मणा धाव धाव असा मानवी वाणीने ओरडला
तो साद श्रीमरामांच्या सादा सारखाच होता
त्यामुळं इकडं पर्णशाळा मध्ये सीतेच्या शरीराला कापरं भरल
श्रीरामांनाच काहीतरी अपघात झाला असावा या कल्पनेनं
तिने लक्ष्मणाला त्यांच्या शोदार्थ पाठवले
आश्रमात ती एकटीच उरली ती संधी साधून
यती भेष दाहरण केलेला रावण पुढं झाला
आणि थोड्याच वेळात त्याने आपला खरा हेतू प्रकट केला
तो तिच्याशी लगट करू लागला
तेव्हा ती महापती व्रता मैथिली त्याला कातर स्वराने बजावू लागली

याचका थांबु नको दारात
याचका थांबु नको दारात
घननीळांची मूर्त वीज मी नकोस जाळूं हात
थांबु नको दारात

कामव्यथेची सुरा प्राशुनी
नकोस झिंगूं वृथा अंगणी
जनकसुतेचा नखस्पर्शही अशक्य तुज स्वप्नांत
थांबु नको दारात

मी न एकटी माझ्याभंवती
रामकीर्तिच्या दिव्य आकृती
दिसल्यावांचुन तुला धाडितील देहासह नरकांत
थांबु नको दारात

जंबुकस्वरसें कसलें हंससी
टक लावुन कां ऐसा बघसी
रामावांचुन अन्य न कांही दिसेल या नयनांत
थांबु नको दारात

या सीतेची प्रीत इच्छिसी
कालकुटांतुन क्षेम वांच्छिसी
चंद्र्सूर्य कां धरूं पाहसी हतभाग्या हातांत
थांबु नको दारात
याचका थांबु नको दारात

वनीं निर्जनीं मला पाहुनी
नेउं पाहसी बळें उचलुनी
प्रदीप्त ज्वाला बांधुन नेसी मूढा कां वसनांत
थांबु नको दारात

निकषोपल निज नयनां गणसी
वर खड्गासी धार लाविसी
अंधपणासह यात आंधळ्यां वसे तुझ्या प्राणांत
थांबु नको दारात

कुठें क्षुद्र तूं कोठें रघुवर
कोठें ओहळ कोठें सागर
विषसदृश तूं रामचंद्र ते अमृत रे साक्षात
थांबु नको दारात

कुठें गरुड तो कुठें कावळा
देवेंद्रच तो राम सांवळा
इंद्रायणीची अभिलाषा कां धरिसी मर्त्य मनात
थांबु नको दारात

मज अबलेला दावुनिया बल
सरसाविसि कर जर हे दुर्बल
श्रीरामाचे बाण तुझ्यावर करितील वज्राघात
थांबु नको दारात
याचका थांबु नको दारात

सरशि कशाला पुढती पुढती
पाप्या बघ तव चरणहि अडती
चरणांइतुकी सावधानता नाहीं तव माथ्यांत
थांबु नको दारात

धांवा धांवा नाथ रघुवर
गजशुंडा ये कमलकळीवर
असाल तेथुन ऐका माझा शेवटचा आकांत शेवटचा आकांत

Curiosidades sobre la música Yachaka Thambun Nako Darant del सुधीर फडके

¿Quién compuso la canción “Yachaka Thambun Nako Darant” de सुधीर फडके?
La canción “Yachaka Thambun Nako Darant” de सुधीर फडके fue compuesta por Sudhir Phadke, G D Madgulkar.

Músicas más populares de सुधीर फडके

Otros artistas de