Tujhe Geet Ganyasathi

Mangesh Padgaonkar, Yeshwant Deo

तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउं दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे
तुझे गीत गाण्यासाठी

शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा
शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी
या सुंदर यात्रेसाठी मला जाउं दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे
तुझे गीत गाण्यासाठी

मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
वाजती सतारी
सोहळयात सौंदर्याच्या
सोहळयात सौंदर्याच्या तुला पाहु दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे
तुझे गीत गाण्यासाठी

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेउन येती गंध धुंद वारे
गंध धुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे
तुझे गीत गाण्यासाठी

एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे
तुझे गीत गाण्यासाठी

Curiosidades sobre la música Tujhe Geet Ganyasathi del सुधीर फडके

¿Quién compuso la canción “Tujhe Geet Ganyasathi” de सुधीर फडके?
La canción “Tujhe Geet Ganyasathi” de सुधीर फडके fue compuesta por Mangesh Padgaonkar, Yeshwant Deo.

Músicas más populares de सुधीर फडके

Otros artistas de