Swar Aale Duruni

Yeshwant Deo, Jog Prabhakar

स्वर आले (स्वर आले)
स्वर आले दुरुनी
स्वर आले दुरुनी
स्वर आले दुरुनी
स्वर आले दुरुनी
स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी
स्वर आले दुरुनी

रसिक हो नमस्कार
सन एकोणीशे अडसष्ट किंवा सत्तरचा सुमार असेल
आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर मी नोकरी करत होतो
एके दिवशी संगीतकार प्रभाकर जोग
ह्यांचं मुंबईहून मला एक पात्र आलं
साधं पत्र पत्रात स्वरांचं नोटीशन लिहिलं होतं
त्या नोटीशनला योग्य असं गीत मी लिहावं
अशी प्रभाकर जोग यांनी पत्रात मला विनंती केली होती
दुसऱ्या संगीतकाराने आधीच चाल तयार केली
आणि त्या चालीवर मी गीत लिहिलं
असा माज्या आयुष्यातला
हा पहिलाच अनुभव म्हणायला पाहिजे
माझ्या मनावर फार मोठं दर्पण आलं होतं
पत्रातला नोटीशन असं होतं
सा नि ध नि ध
नि ध प ध प
सा नि ध नि ध
नि ध प ध प
ग म प प प ध
ध नि रे नि ध प ध सा
सा नि ध नि ध
नि ध प ध प
सा नि ध नि ध
नि ध प ध प
गायक सुधीर फडके यांनी हे माझं गाणं गायलं आहे
आणि रसिक हो आता आपण ते ऐका

स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी
स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी
स्वर आले दुरुनी

निर्जीव उसासे वाऱ्यांचे
आकाश फिकटल्या ताऱ्यांचे
निर्जीव उसासे वाऱ्यांचे
आकाश फिकटल्या ताऱ्यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची
हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी
स्वर आले दुरुनी
स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी
स्वर आले दुरुनी

विरहार्त मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
विरहार्त मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले
जखमेतुन क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी
स्वर आले दुरुनी
स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी
स्वर आले दुरुनी

पडसाद कसा आला न कळे
पडसाद कसा आला न कळे
अवसेत कधी का तम उजळे
पडसाद कसा आला न कळे
अवसेत कधी का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केलि कुणी
स्वर आले दुरुनी
स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी
स्वर आले दुरुनी

Curiosidades sobre la música Swar Aale Duruni del सुधीर फडके

¿Quién compuso la canción “Swar Aale Duruni” de सुधीर फडके?
La canción “Swar Aale Duruni” de सुधीर फडके fue compuesta por Yeshwant Deo, Jog Prabhakar.

Músicas más populares de सुधीर फडके

Otros artistas de