Sawla Ga Ramchandra

G. D. Madgulkar

श्रीराम जन्माच्या या आनंद गीतातच अयोध्या मग्न होती
प्रासादात श्रीराम दिशानाशाने वाढत होते
ते आता चालू लागले बोबडं बोबडं बोलू लागले
आणि महाराणी कौसल्या
आपल्या भगिनी समान असलेल्या सवतींना
कौतुकाने सांगू लागली
सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो
अष्ठगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो

सांवळा ग रामचंद्र
माझ्या मांडीवर न्हातो
माझ्या मांडीवर न्हातो
सांवळा ग रामचंद्र
माझ्या मांडीवर न्हातो
माझ्या मांडीवर न्हातो
अष्ठगंधांचा सुवास
निळ्या कमळांना येतो
निळ्या कमळांना येतो

सांवळा ग रामचंद्र
माझ्या हातांनीं जेवतो
माझ्या हातांनीं जेवतो
सांवळा ग रामचंद्र
माझ्या हातांनीं जेवतो
माझ्या हातांनीं जेवतो
उरलेल्या घासासाठीं
थवा राघूंचा थांबतो
थवा राघूंचा थांबतो

सांवळा ग रामचंद्र
रत्नमंचकी झोंपतो
सांवळा ग रामचंद्र
रत्नमंचकी झोंपतो
त्याला पाहतां लाजून
चंद्र आभाळीं लोपतो
चंद्र आभाळीं लोपतो

सांवळा ग रामचंद्र
चार भावांत खेळतो
सांवळा ग रामचंद्र
चार भावांत खेळतो
हीरकांच्या मेळाव्यांत
नीलमणी उजळतो
नीलमणी उजळतो

सांवळा ग रामचंद्र
करी भावंडांसी प्रीत
सांवळा ग रामचंद्र
करी भावंडांसी प्रीत
थोराथोरांनी शिकावी
बाळाची या बाळरीत
बाळाची या बाळरीत

सांवळा ग रामचंद्र
त्याचे अनुज हे तीन
सांवळा ग रामचंद्र
त्याचे अनुज हे तीन
माझ्या भाग्याच्या श्लोकाचे
चार अखंड चरण
चार अखंड चरण

सांवळा ग रामचंद्र
करी बोबडे भाषण
सांवळा ग रामचंद्र
करी बोबडे भाषण
त्याशी करितां संवाद
झालों बोबडे आपण
झालों बोबडे आपण

सांवळा ग रामचंद्र
करी बोबडे हें घर
सांवळा ग रामचंद्र
करी बोबडे हें घर
वेद म्हणतां विप्रांचे
येती बोबडे उच्चार
येती बोबडे उच्चार

सांवळा ग रामचंद्र
चंद्र नभींचा मागतो
सांवळा ग रामचंद्र
चंद्र नभींचा मागतो
रात जागवितो बाई
सारा प्रासाद जागतो
सारा प्रासाद जागतो

सांवळा ग रामचंद्र
उद्यां होईल तरुण
सांवळा ग रामचंद्र
उद्यां होईल तरुण
मग पुरता वर्षेल
देवकृपेचा वरुण
देवकृपेचा वरुण
देवकृपेचा वरुण
देवकृपेचा वरुण

Curiosidades sobre la música Sawla Ga Ramchandra del सुधीर फडके

¿Quién compuso la canción “Sawla Ga Ramchandra” de सुधीर फडके?
La canción “Sawla Ga Ramchandra” de सुधीर फडके fue compuesta por G. D. Madgulkar.

Músicas más populares de सुधीर फडके

Otros artistas de