Ramavin Rajyapadi Kon Baisato

G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE

रामाने जाऊ नये म्हणून त्यान पोटाशी धरून कौसल्येने कितीही आक्रोश केला
तरी रामाचा निश्चय काही बदलला नाही
उलट त्यांनी तिला समजावून सांगितलं कि आई
ह्या वेळेला तुझं कर्तव्य असं आहे
कि पुत्र प्रेम तू बाजूला ठेवावंसं
आणि माझ्या वडिलांच्या अत्यंत दुस्साह आणि दारुण अवस्थे मध्ये
तू याच ठिकाणी राहावंसं त्यांना धीर द्यावास त्यांचं सांत्वन करावंसं
कारण मला हे माहित आहे कि त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे
तो पूर्ण पणे स्वतःच्या इच्छे विरुद्ध घेतला आहे
आणि ह्याच्या त्यांना काय यातना होत असतील याची मला पूर्णपणे कल्पना आहे
पित्याच्या वचनाचं पालन करण हे पुत्र म्हणू माझं कर्तव्यच नव्हे का आई
स्थिर डोळ्यांनी हे सर्व पाहत असलेल्या लक्षुमणाला मात्र
आता हे सहन होई ना तो संतापून म्हणाला
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
घेउनियां खड्ग करीं मीच पाहतो
घेउनियां खड्ग करीं मीच पाहतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
श्रीरामा तूं समर्थ
मोहजालिं फससि व्यर्थ
श्रीरामा तूं समर्थ
मोहजालिं फससि व्यर्थ
पाप्यांचे पाप तुला उघड सांगतो
पाप्यांचे पाप तुला उघड सांगतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
वरहि नव्हे वचन नव्हे
कैकयिला राज्य हवें
वरहि नव्हे वचन नव्हे
कैकयिला राज्य हवें
विषयधुंद राजा तर तिजसि मानतो
विषयधुंद राजा तर तिजसि मानतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
वांच्छिति जे पुत्रघात
ते कसले मायतात
वांच्छिति जे पुत्रघात
ते कसले मायतात
तुज दिधला शब्द कसा नृपति मोडतो
तुज दिधला शब्द कसा नृपति मोडतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
लंपट तो विषयिं दंग
तुजसि करी वचनभंग
लंपट तो विषयिं दंग
तुजसि करी वचनभंग
भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो
भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
घेउनियां खड्ग करीं मीच पाहतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
वर दिधलें कैकयीस
आठवले या मितीस
वर दिधलें कैकयीस
आठवले या मितीस
आजवरी नृपति कधी बोलला न तो
आजवरी नृपति कधी बोलला न तो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
मत्त मतंगजापरी
दैव तुझें चाल करी
मत्त मतंगजापरी
दैव तुझें चाल करी
श्रीरामा मीच त्यास दोर लावितो
श्रीरामा मीच त्यास दोर लावितो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
बैस तूंच राज्यपदीं
आड कोण येइ मधीं
बैस तूंच राज्यपदीं
आड कोण येइ मधीं
येउं देत कंठस्‍नान त्यास घालितो
येउं देत कंठस्‍नान त्यास घालितो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
येउं देत तिन्ही लोक
घालिन मी त्यांस धाक
येउं देत तिन्ही लोक
घालिन मी त्यांस धाक
पाहूं देच वृद्ध पिता काय योजितो
पाहूं देच वृद्ध पिता काय योजितो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
शत शतके पाळ धरा
श्रीरामा चापधरा
शत शतके पाळ धरा
श्रीरामा चापधरा
रक्षणासि पाठीं मी नित्य राहतों
रक्षणासि पाठीं मी नित्य राहतों
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
येइल त्या करिन सजा
बंधू नच दास तुझा
येइल त्या करिन सजा
बंधू नच दास तुझा
मातुश्री कौसल्येशपथ सांगतो
मातुश्री कौसल्येशपथ सांगतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
घेउनियां खड्ग करीं मीच पाहतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो

Curiosidades sobre la música Ramavin Rajyapadi Kon Baisato del सुधीर फडके

¿Quién compuso la canción “Ramavin Rajyapadi Kon Baisato” de सुधीर फडके?
La canción “Ramavin Rajyapadi Kon Baisato” de सुधीर फडके fue compuesta por G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE.

Músicas más populares de सुधीर फडके

Otros artistas de