Prabho Maj Ekach Var Dhyava

G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE

त्रिवार जय जय कार करून अयोध्याच्या प्रजाजनाने
श्री रामांना आपल्या प्रासादाकडे नेले योग्य मुहूर्त पाहून
राम सीताना राज्य अभिषेक करवला
राम राजाला शुभारंभ झाला श्री रामाने सुग्रीव अंगद
यांच्या सह सर्व वानर वीरांचा यतूच्छीत सन्मान केला
सुग्रीवाला त्याने आपला पाचवा भाऊच मानला
आणि त्याला क्रिस्टीनद्याला परत जाण्याची आज्ञा केली
विभीषणाला असंख्य भूषण प्रदान केले
आणि लंकेत जाण्याविषयी अनिज्ञा दिली
हा निरोप समारंभ चालू असतानाच
हनुमंत समोर आला
आणि श्री रामाचें चरण घट्ट धरून
अत्यंत भाव अवस्थेत म्हणाला

प्रभो मज एकच वर द्यावा
प्रभो मज एकच वर द्यावा
या चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा
एकच वर द्यावा
प्रभो मज एकच वर द्यावा

कधिं न चळावे चंचल हें मन
श्रीरामा या चरणांपासुन
कधिं न चळावे चंचल हें मन
श्रीरामा या चरणांपासुन
जोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा
एकच वर द्यावा
प्रभो मज एकच वर द्यावा

रामकथा नित वदनें गावी
रामकथा या श्रवणीं यावी
रामकथा नित वदनें गावी
रामकथा या श्रवणीं यावी
श्रीरामा मज श्रीरामाविण दुसरा छंद नसावा
एकच वर द्यावा
प्रभो मज एकच वर द्यावा

पावन अपुलें चरित्र वीरा
सांगुं देत मज देव अप्सरा
पावन अपुलें चरित्र वीरा
सांगुं देत मज देव अप्सरा
श्रवणार्थी प्रभु अमरपणा या दीनासी यावा
एकच वर द्यावा
प्रभो मज एकच वर द्यावा

मेघासम मी अखंड प्राशिन
असेल तेथुन श्रीरामायण
मेघासम मी अखंड प्राशिन
असेल तेथुन श्रीरामायण
मेघापरी मी शतधारांनीं करीन वर्षावा
एकच वर द्यावा
प्रभो मज एकच वर द्यावा

रामकथेचें चिंतन गायन
तें रामांचें अमूर्त दर्शन
रामकथेचें चिंतन गायन
तें रामांचें अमूर्त दर्शन
इच्छामात्रें या दासातें रघुकुलदीप दिसावा
एकच वर द्यावा
प्रभो मज एकच वर द्यावा

जोंवरि हें जग जोंवरि भाषण
तोंवरि नूतन नित रामायण
जोंवरि हें जग जोंवरि भाषण
तोंवरि नूतन नित रामायण
सप्तस्वरांनी रामकथेचा स्वाद मला द्यावा
एकच वर द्यावा
प्रभो मज एकच वर द्यावा

असंख्य वदनें असंख्य भाषा
सकलांची मज एकच आशा
असंख्य वदनें असंख्य भाषा
सकलांची मज एकच आशा
श्रीरामांचा चरित्र गौरव त्यांनी सांगावा
एकच वर द्यावा
प्रभो मज एकच वर द्यावा

सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी
फिरेन अवनीं फिरेन गगनी
सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी
फिरेन अवनीं फिरेन गगनी
स्थलीं स्थलीं पण रामकथेचा लाभ मला व्हावा
एकच वर द्यावा
प्रभो मज एकच वर द्यावा
प्रभो मज एकच वर द्यावा

Curiosidades sobre la música Prabho Maj Ekach Var Dhyava del सुधीर फडके

¿Quién compuso la canción “Prabho Maj Ekach Var Dhyava” de सुधीर फडके?
La canción “Prabho Maj Ekach Var Dhyava” de सुधीर फडके fue compuesta por G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE.

Músicas más populares de सुधीर फडके

Otros artistas de