Petavi Lanka Hunumant

Sudhir Phadke, G D Madgulkar

सीतेच्या सर्व प्रश्नांना आणि शंखाना
हनुमंताने समर्पित उत्तरे दिले
आणि तिच्या मुक्ततेसाठी श्री रामचंद्र निच्चीत येणार
असल्याच शप्पत पूर्ण कथन केले
रामाला ओळख पटावी म्हणून सीतेने
आपल्या जवळचा एक मणी हनुमंताच्या स्वाधीन केला
वास्तविक सीतेला घेऊन जाणाऱ्या हनुमंत हि समर्थ होता
पण परपुरषाच्या स्कंधावर बसून जाणं योग्य नाही
माझी सुटका रामनेच केली पाहिजे असा सीतेने निशकुन सांगितलं
विचारी आणि भ्रमिष्ट हनुमंताला तिच म्हणनं पटलं
तिचा निरोप घेऊन तो निघाला जाता जाता
त्याच्या मनामध्ये आला कि ह्या राक्षचाच बळ तरी काय आहे
ते पाहाव आणि ह्या विचारासरशी त्यानं अशोकवन
उध्वस्त करून टाकल जंबुमाळी आणि रावणपुत्र अक्ष यांना ठार केल
लंकेच्या कुलदैवताचा नाश केला तेव्हा रावणपुत्र इंद्रजितान
त्याला ब्रम्हस्थानी बंद केलं आणि रावणाच्या सभेत नेल
तिथं त्याला ठार मारण्याची आज्ञा रावनाणं दिली
पण रावणाचा भाऊ जो विभूषण
त्यांना दूताला मारणानं राजनीतीला धरून नाही
असा आग्रहन प्रतिबाधान केला शेवटी रावणाच्या आज्ञेन
हनुमंताच्या पुच्छाला वस्त्र बांधून राक्षसाने ते पुच्छ पेटून दिल
राक्षसाने हे वृत्त सीतेला सांगितलं तेव्हा तीन अग्नीचा धावा केला
आणि हनुमंताला इजा होऊ नये अस मागणं अग्नी जवळ मागितल
पेटत्या पुच्छानीशी हनुमंत रावणाच्या राजसभेमधून उडाला आणि

लीलया उडुनी गगनांत
लीलया उडुनी गगनांत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत

नगाकार घन दिसे मारुती
विजेपरी तें पुच्छ मागुतीं
नगाकार घन दिसे मारुती
विजेपरी तें पुच्छ मागुतीं
आग वर्षती नगरीवरती
गर्जना करी महावात
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत

या शिखराहुन त्या गेहावर
कंदुकसा तो उडे कपीवर
या शिखराहुन त्या गेहावर
कंदुकसा तो उडे कपीवर
शिरे गवाक्षीं पुच्छ भयंकर
चालला नगर चेतवीत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत

भडके मंदिर पेटे गोपुर
द्वार कडाडुन वाजे भेसुर
भडके मंदिर पेटे गोपुर
द्वार कडाडुन वाजे भेसुर
रडे ओरडे तों अंतःपुर
प्रकाशीं बुडे वस्तुजात
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत

जळे धडधडा ओळ घरांची
राख कोसळे प्रसादांची
जळे धडधडा ओळ घरांची
राख कोसळे प्रसादांची
चिता भडकली जणूं पुराची
राक्षसी करिती आकांत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत

कुणी जळाले निजल्या ठायीं
जळत पळत कुणि मार्गी येई
कुणी जळाले निजल्या ठायीं
जळत पळत कुणि मार्गी येई
कुणि भीतीनें अवाक होई
ओळखी नुरल्या प्रलयांत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत

माय लेकरां टाकुन धावे
लोक विसरले नातीं नावें
माय लेकरां टाकुन धावे
लोक विसरले नातीं नावें
उभे तेवढें पडें आडवें
अचानक आला कल्पांत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत

खड्गे ढाली पार वितळल्या
वीरवृत्ति तर सदेह जळल्या
खड्गे ढाली पार वितळल्या
वीरवृत्ति तर सदेह जळल्या
ज्वाळेमाजीं ज्वाळा मिळाल्या
सघनता होय भस्मसात
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत

वारा अग्नी अग्नी वारा
नुरे निवारा नाहीं थारा
जळल्या वेशी जळे पहारा
नाचतो अनल मूर्तिमंत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत
पेटवी लंका हनुमंत

Curiosidades sobre la música Petavi Lanka Hunumant del सुधीर फडके

¿Quién compuso la canción “Petavi Lanka Hunumant” de सुधीर फडके?
La canción “Petavi Lanka Hunumant” de सुधीर फडके fue compuesta por Sudhir Phadke, G D Madgulkar.

Músicas más populares de सुधीर फडके

Otros artistas de