Nako Karus Valgana

Sudhir Phadke, G D Madgulkar

हीच ती रामांची स्वामिनी सीता
अशी निश्चित खात्री पटून सुध्दा
हनुमंत एकदम तिच्या समोर जायला धजला नाही
तिनं त्याला पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं
आणि राम सुग्रीव ऐक्याची तिला कल्पना नव्हती
न जाणो मायावी रावण म्हणून आपल्याशी बोलणे तिने नाकारलंच तर
हनुमान अश्या विचारात आहे
तेवढ्यात सेवक गणांसह लंकापती रावण त्या ठिकाणी आला
आणि सीतेने वश व्हावं म्हणून तिला तो धाग घालू लागला
तेव्हा चिढलेल्या नागरानी सारखी सीता त्याला म्हणाली

नको करूंस वल्गना रावणा निशाचरा
नको करूंस वल्गना रावणा निशाचरा
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां
ज्ञात हें सुरासुरां

वंदनास योग्य मी पराविया पतिव्रता
पुण्य जोड राक्षसा झणीं करुन मुक्तता
लाज राख नारिची वीर तूं जरी खरा
लाज राख नारिची वीर तूं जरी खरा
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां
ज्ञात हें सुरासुरां

नृपति-पाप पाहतें, अनयनित्य साहतें
राष्ट्र तें जगावरी नाममात्र राहतें
काय आग लाविशी तुझ्या करें तुझ्या पुरा
काय आग लाविशी तुझ्या करें तुझ्या पुरा
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां
ज्ञात हें सुरासुरां

जिथें तिथें दिसे मला लोकनाथ राम तो
शयनिं ये उशातळीं रामहस्तवाम तो
चिंतनांत पूजिते त्याच मी धनुर्धरा
चिंतनांत पूजिते त्याच मी धनुर्धरा
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां
ज्ञात हें सुरासुरां

योग्य एक त्यास मी, योग्य ना दुजा कुणा
परत धाड रे मला प्रियासमीप रावणा
शरण त्यांस रक्षुनी राम देइ आसरा
शरण त्यांस रक्षुनी राम देइ आसरा
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां
ज्ञात हें सुरासुरां

सख्य जोड त्यासवें, हो कृतार्थ जीवनीं
नित्यशुद्ध जानकी राघवास अर्पुनी
ना तरी मृतीच ये चालुनी तुझ्या घरा
ना तरी मृतीच ये चालुनी तुझ्या घरा
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां
ज्ञात हें सुरासुरां

इंद्रवज्रही कधी चुकेल घाव घालितां
क्षणहि आयु ना तुझे रामचंद्र कोपतां
रामबाणवृष्टि ती प्रळयसी भयंकरा
रामबाणवृष्टि ती प्रळयसी भयंकरा
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां
ज्ञात हें सुरासुरां

ठाकतां तुझ्यापुढें वीर युद्धकाम तो
ठेवणार वंश ना असा समर्थ राम तो
अधम काममूढ तूं, विचार हा करी जरा
अधम काममूढ तूं, विचार हा करी जरा
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां
ज्ञात हें सुरासुरां

बघेन रामबाण मी निडर या तुझ्या उरीं
कंक पंख पाठिशीं, नामचिन्ह ज्यावरी
भारमुक्त होउं दे एकदां वसुंधरा
भारमुक्त होउं दे एकदां वसुंधरा
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां
ज्ञात हें सुरासुरां

Curiosidades sobre la música Nako Karus Valgana del सुधीर फडके

¿Quién compuso la canción “Nako Karus Valgana” de सुधीर फडके?
La canción “Nako Karus Valgana” de सुधीर फडके fue compuesta por Sudhir Phadke, G D Madgulkar.

Músicas más populares de सुधीर फडके

Otros artistas de